Moshi News : तब्बल 22 वर्षानंतर शालेय जीवनातील आठवणींना मिळाला उजाळा

श्री नागेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

एमपीसीन्यूज : सुमारे 22  वर्षानंतर श्री नागेश्वर विद्यालय, मोशी येथील माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी एकत्र आल्या. सन 1997 – 98 या वर्षाच्या   इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुरूळी येथे नुकताच उत्साहात पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांसह शाळेचे प्राचार्य अरण्ये, शिक्षक थोरात सर, सोनवणे सर, माळी सर, दहितुले सर, शेरखाने सर, भोईटे सर, शिंदे, झेडगुले, आढागळे, फुगे, सातव, निकम तसेच सेवक लांडे व भरत आदी उपस्थित होते.

अनेक वर्षानंतर भेटल्यानंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा लहान मुलांसारखी मस्ती करण्यात दंग झाले होते. यावेळी आपल्या हातून घडलेलया व समाजात नावलौकिक कमावणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांचं उर आनंदाने भरून गेला.

सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन करावी व त्यामार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करावी. सर्वांना यामध्ये कामाची संधी देत पारदर्शक कारभार पहावा व त्यातून शिक्षण क्षेत्रात चांगली दिशा देण्याचे काम करावे, असे मुख्याध्यापक अरण्ये म्हणाले.

यावेळी सर्व शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी गोपाळ फुलावरे यांनी शाळेसाठी आर्थिक देणगी दिली. तसेच आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत वर्षातून एकदा तरी भेट देण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.

सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव, सीता गवळी, विनय जाधव, मनोज आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन विनायक घिगे, संदेश बनकर, संदीप बर्गे, भानुदास सस्ते, देवदत्त मुर्हे, प्रवीण दर्शीले, नागेश नीघोज़कर, संतोष बोऱ्हाडे, पंकज पेंडसे, विकास जांभूळकर, दिलीप मेदनकर, अमितराजे राजेशीर्के, विश्वास बर्गे व महिला प्रतिनिधी राणी काळभोर, शिवकन्या थोरात, सीमा मुर्हे, कविता सस्ते व सीता गवळी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.