Moshi News: विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गंधर्वनगरी, मोशी येथे उघडकीस आला आहे.

प्रशांत धनराज पाटील (वय 30), धनराज शंकर पाटील (वय 45), सुलोचना धनराज पाटील (वय 45), राहुल धनराज पाटील (वय 34), प्रियांका राहुल पाटील (वय 29, सर्व रा. गंधर्वनगरी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2020 ते 7 मे 2020 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून घरातील किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ केला.

तसेच विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शनिवारी (दि.29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.