Moshi News : मोशी येथील सफारी पार्क, मनोरंजन केंद्र एमटीडीसी मार्फत विकसित करा

महेश लांडगे यांची पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – मोशी येथे 140 हेक्टर 62 आर एवढ्या क्षेत्रावर सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र विकसित करण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्याला लवकर गती देऊन सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र एमटीडीसी कडून विकसित करावे, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

आमदार लांडगे यांनी याबाबत राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्या म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील सफारी पार्क, मनोरंजन केंद्र एमटीडीसी कडून विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबत 22 सप्टेंबर 2020 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक देखील घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात मोशी येथील 140 हेक्टर 62 आर एवढे क्षेत्र सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्रासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यातील 44 हेक्टर 72 आर एवढ्या क्षेत्रात सफारी पार्क तर 95 हेक्टर 90 आर एवढ्या क्षेत्रात मनोरंजन पार्क उभारण्यात येणार आहे.

सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या विकासनाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मिळाला. तसेच या दोन्ही आरक्षणाचे तातडीने विकसन करावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.