Moshi News : नगरसेविका अश्विनी जाधव यांच्यावतीने सांगली पूरग्रस्तांसाठी धान्य वाटप

एमपीसीन्यूज : मोशी येथील भाजप नगरसेविका अश्विनी जाधव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली सांगली जिल्ह्यातील धनगाव (ता. पलूस) येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.

नगरसेविका जाधव यांच्यावतीने धनगाव गावातील सरपंच सतपाल साळुंखे यांच्या उपस्थितीत पुरग्रस्तांना धान्य, बिस्किट , पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. ही मदत मिळाल्याने ग्रामस्थ आनंदीत झाले. तसेच याच गावातील दोन लहान मुलांच्या शिक्षणासाठीही मदत करण्यात आली.

सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मात्र, ज्या पूरग्रस्तांपर्यंत अद्याप मदत पोहोचली नाही त्यांची माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोच करणे गरजेचे असल्याचे नगरसेविका जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.