Moshi News: मोशी-आदर्शनगरमध्ये वीजवाहिन्या होणार भूमिगत

एमपीसी न्यूज – आदर्शनगर- मोशी येथील वीजवाहिन्या धोकादायकपणे (Moshi News) उघड्यावर न ठेवता भूमिगत करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले असून, स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह चंद्रकांत तापकीर, सचिन तापकीर, राजू सस्ते, वंदना आल्हाट आणि महावितरणचे अधिकारी रमेश सूळ यांच्या उपस्थितीत मिनी फिडरच्या पीलरचे भूमिपूजन करण्यात आले.

वास्तविक, आदर्शनगर येथील मोर्य कॉलनी येथील स्थानिक नागरिकांना धोकादायकपणे वीजपुरवठा घ्यावा लागत होता. त्यामुळे या वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. याबाबत ‘परिवर्तन हेल्पलाईन’ वर तक्रार प्राप्त झाली होती.

Pimpri News : आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 1622 अर्ज

स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून कामाला गती देण्यात आली, अशी माहिती ‘परिवर्तन’चे समन्वयक ऋषभ खरात यांनी दिली. महावितरणच्या मोशी शाखेअंतर्गत ‘डीपीडीसी’योजने (Moshi News) अंतर्गत केबल व मिनी फिडर पिलर टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना घरांवरुन किंवा उघड्यावरुन वीज कनेक्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सुमारे 700 रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.