_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Moshi News : मोशीतील गरजूंसाठी ‘नागेश्वर महाराज अन्नछत्र’चा शुभारंभ

एमपीसी न्यूज – मोशीतील गरजूंसाठी ‘नागेश्वर महाराज अन्नछत्र’ सुरू करण्यात आले आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते आज (दि.16) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. भोसरी विधानसभा शिवसेना प्रमुख नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्या युवा फाउंडेशन, मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 500 हून अधिक गरजू लोकांच्या जेवणाची सोय याठिकाणी होईल.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख नगरसेवक धनंजय आल्हाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, नगरसेवक बबन बोराटे, मार्तंड देवस्थान विश्वस्त तुषार सहाणे, सचिन सानप, राहुल भोसले, अरूण गिरी, सुदाम आल्हाट, अरूण बोऱ्हाडे, दिलीप बोऱ्हाडे, कविता आल्हाट, सोपान बोराटे, गुलाब आल्हाट, राजेश सस्ते, नितीन सस्ते, उदय तापकीर, दिपक सस्ते, हिरामण सस्ते, परमेश्वर आल्हाट, परशूराम आल्हाट, संतोष बोराटे, गणेश बोराटे, अनिल बनकर, शांताराम बोराटे, संजय लडकत, प्रकाश गव्हाणे, दत्तात्रय मोकाशी, अमृत आल्हाट आदी उपस्थित होते.

‘नागेश्वर महाराज अन्नछत्र’ उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी लोकांना मोफत जेवण थाळी मोफत उपलब्ध होणार आहे. तसेच, कोरोना बाधित, होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांना मोफत घरपोच डबा पुरवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.