Moshi News : मोशी प्राधिकरणमध्ये भक्ती भावात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा

एमपीसी न्यूज – मोशी प्राधिकरण येथे गुरुवारी (दि.23) श्री स्वामी समर्थ (Moshi News) महाराज प्रकट दिना निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व संघर्ष संस्था संस्थापक पंकज शिवाजी पवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी दिवसभर विविध कार्यक्रम करण्यात आले.

 

यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई, नगरसेविका नम्रता योगेश लोंढे,  त्याचप्रमाणे नगरसेवक विलास मडगिरे, जेजुरी देवस्थान अध्यक्ष शिवसेना नेते तुषार सहाने,  युवानेते निखिल काळकुटे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, सरिता पायमोडे, राजश्री गारगे, एडवोकेट सुषमा नामदास, शिवराज लांडगे, माजी नगरसेवक संजय वाबळे आदी उपस्थित होते.

 

 

Chikhli Crime News : हॉस्पिटल, नोकरी अशा अडचणी सांगत महिलेकडून उकळले तब्बल 38 लाख

 

 

स्वामी समर्थ महाराजांचा सकाळी रुद्राभिषेक करण्यात आला सांप्रदायिक भजनाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर झाला. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिर मध्ये (Moshi News)  मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी रक्तदान देखील केले तसेच प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्त श्री स्वामी समर्थ महाराज मूळ स्थान समाधी मठ अक्कलकोट चरण पादुका पालखी परिक्रमा संपूर्ण संत नगर मधील सेक्टर नंबर चार-सहा नऊ या भागातून मिरवणूक काढण्यात आली.

 

स्वामी गीतांचा स्वामी संगीताचा कार्यक्रम अतिशय सुंदर घेण्यात आला त्या दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारात व साईबाबांच्या अवतारात आदिशक्ती अन्नपूर्णा देवीच्या रूपात वेशभूषा केली होती. त्याचप्रमाणे पंधरा ते वीस हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

 मंदिर बांधकाम संकल्प स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली असोक्षर मोहिमेमध्ये साडेतीन हजार लोकांनी सहभाग घेतला व आपले नाव नंबर सह्या सहित सर्वांचे लाडके आमदार महेश लांडगे यांना पत्र देण्यात आले व त्या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांनी थोड्याच दिवसांमध्ये येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मंदिराची उभारणी माझ्या माध्यमातून करेन असे आश्वासन दिले. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचे ही महेश लांडगे यांनी सांगितले.

 

संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ता गवस खजिनदार दिनेश केंगार सचिव प्रदीप बरगाले संस्थेचे सर्व कार्यकर्ते संतोष राठोड शिवम गवस अजय जगताप सागर ताठे सुरेश बोराटे बाळासाहेब फटांगडे तुषार गायकर अमित दुर्गुडे प्रशांत कुडाळकर सुखदेव चेल त्याचप्रमाणे महिला स्वयंसेवक स्वामी भक्त त्यामध्ये प्रीती पवार शामल चेल जयश्री झोंबाडे जयश्री अभंग दीप्ती शेटे साक्षी (Moshi News)  जगताप रेश्मा गवस कौशल्या केंगार मनीषा घोलप दिपाली कोंडे किरण भगत मोनिका चोपडे संध्या मस्के सुतार वहिनी स्मिता बनकर शितल सुतार.सर्व सेवेकरी कार्यकर्ते मंडळी यांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.