Moshi News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोशीतील नागेश्वर महाराज यात्रा रद्द

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोशी येथील श्री नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. तसेच उसवानिमित्त धार्मिक विधी साधेपणाने करण्यात येणार आहेत.

महाशिवरात्री निमित्त मोशीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर येथे दरवर्षी यात्रा भरवली जाते. ही यात्रा यावर्षी 11 ते 14 मार्च 2021 या कालावधीत नियोजित होती. यात्रेमध्ये धार्मिक विधी, भंडारा (प्रसाद वाटप), लोकनाट्य तमाशा, कुस्ती यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेसाठी मोशी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोशीमध्ये येतात.

मात्र, सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. धार्मिक विधी वगळता इतर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. याबाबतच्या सूचना देखील एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिल्या आहेत.

यात्रेत असंख्य लोक एकत्र येतात. लोकांच्या एकत्र येण्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी शक्यता आहे. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान, शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे देखील आदेश लागू करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.