Moshi : पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी सोसायटीमधील एकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री शिवाजीवाडी, मोशी येथे घडली.

बद्रीनारायण जगन्नाथ काकडे (वय 31), हनुमंत मुरलीधर भोर (वय 30) आणि आयुष इमाम शेख (वय 41, सर्व रा. शिवक्‍लासिक सोसायटी, शिवाजीवाडी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अमित रूबाबराव जगताप (वय 38, रा. मोशी) यांनी सोमवारी (दि. 16) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काकडे आणि फिर्यादी जगताप यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी काकडे याने शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी जगताप यांना शिवीगाळ करीत कोणत्यातरी वस्तूने मारहाण करीत जखमी केले. तर आरोपी भोर आणि शेख यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.