Moshi : टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या तीनचाकी टेम्पोने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी साडेसातच्या सुमारास बनकरवस्ती, मोशी येथे घडली.

संतोष हिरामण वैरागर (वय 43 रा. शिवजावाडी, मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी प्रभाकर मंडू वैरागर (वय 60) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब जंगलु निसर्गंध (वय 41, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मयत संतोष हे शेतीत नांगरणीचे काम करण्यासाठी पाटील यांचा ट्रॅक्टर आणायला बनकरवस्ती येथे गेले होते. ते बनकर वस्ती येथे जात असताना भरधाव वेगात आलेल्या तीनचाकी टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.