Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता आल्हाट आळी, मोशी येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू यशवंत वामन (वय 39, रा. मोशी आळंदी रोड, लक्ष्मी नगर, मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार बोराटे (रा. मोशी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वामन यांचा भाऊ आणि आरोपी तुषार या दोघांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून तुषार याने वामन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घातला. यामध्ये वामन हे गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.