Moshi : बो-हाडेवाडी मोशी प्राधिकरण येथील 100 अनधिकृत बांधकामे पाडली

एमपीसी न्यूज- पिपरी चिंचवड महापालिका क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.02 बो-हाडेवाडी मोशी व प्राधिकरण येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून 100 पत्राशेड, टपऱ्या पाडण्यात आल्या. गिरीवरी (दि. 23) महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.

या कारवाईमध्ये अंदाजे 12 हजार चौ.फूट क्षेत्र पाडण्यात आले तसेच 20 हातगाड्या, टपऱ्या, विक्री करणारी वाहने इत्यादी जप्त करण्यात आली.
सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.

7 क्रेन ,2 डंपर 6 जेसीबी च्या साहाय्याने केलेल्या या कारवाईत दोन पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.