Moshi : कारच्या धडकेत पादचारी तरुण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचारी तरुण जखमी झाला. ही घटना 19 मार्च रोजी पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली.

नारायण मारूती भाग्यवान (वय 27, रा. खानापूर, पिंगळी रोड, परभणी), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी रविवारी (दि. 5) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमएच 14 / सीके 8216 या कारवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी भाग्यवान हे पुणे नाशिक महामार्गावरील मोशी येथून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत भाग्यवान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.