Moshi News : मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालिकेची प्लास्टिक बंद कारवाई मोहीम

प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांकडून 25 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पालिका प्रशासनाने मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्लास्टिक बंदी कारवाईची मोहीम राबवली. यामध्ये प्रशासनाने साडेबारा किलो प्लास्टिक जप्त करत 25 हजारांचा दंड वसूल केला.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने ही मोबाईल राबवण्यात आली.

मोहिमेत सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, विजय दवाळे, पोलिस निरिक्षक गिरणार, भांडे, आरोग्य निरिक्षक अंकुश झीटे, वैभव कांचनगौडा, आरोग्य मुकादम रविंद्र गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या क प्रभाग व भोसरी पोलीस शाखा यांच्यातर्फे संयुक्तरित्या मोशी बाजार समिती मार्केट येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये बाजार समितीमधील सुमारे 40 व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली.

त्यातील पाच व्यावसायिकांकडून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्याबाबत त्यांच्याकडून सुमारे 25 हजार प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले. तसेच साडेबारा किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.