Raid on spa center : मोशी येथील स्पा सेंटरवर छापा टाकून चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : मोशी प्राधिकरण येथील क्राऊन नावाच्या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई केली.(Raid on spa center) त्यात चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली. तर याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

स्पा मॅनेजर खतिजा मोजिब खान (वय 21, रा. भोसरी), स्पा मालक अजय अरुण वाळके (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील खतिजा खानला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MP Girish Bapat : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करा : खासदार गिरीश बापट 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चार महिलांना पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. महिलांकडून स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला.(Raid on spa center) याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम 4 हजार 4 हजार रुपयांचे मोबाईल व 120 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 8 हजार 120 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलीस अमंलदार सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती कारोटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव पोलीस शिपाई झावरे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.