Moshi: लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरूणाला अटक

एमपीसी न्यूज – 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तरूणाने तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडित तरूणी गर्भवती राहून तिने 13 सप्टेंबर रोजी मुलाला जन्म दिला. हा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे.

अमोल अंजाराम काजळकर (वय 20, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोलने पिडीत मुलीला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर 1 वर्षांपासून वेळोवेळी बलात्कार केला. यातून पिडीता गर्भवती राहिली. पिडीतेने 13 सप्टेंबर रोजी बाळाला जन्म दिला. दाखल फिर्यादीनुसार अमोलला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.