Moshi : वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेशपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – वाहनांचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण, तपासणीचे कामकाज पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.

राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार वाहनाचे योग्यताप्रमाणपत्र नूतनीकरण व तपासणीचे कामकाज सोमवार (दि. 23 मार्च) पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.

याबाबतचे पत्रक पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिले आहे. संबंधित नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्या वाहनांची योग्यताप्रमाण नूतनीकरण तपासणी पुढील आदेशानंतर करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.