Moshi : भरधाव वेगात दुचाकी चालवणे पडले महागात; अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात दुचाकीवरून जात (Moshi) असताना दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 15 मे रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास डुडुळगाव मोशी येथून देहू फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

पवन सुनील सोनसळे (वय 27, रा. मोरेवस्ती चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करा; अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सोनसळे हा त्याच्या दुचाकीवरून डुडुळगाव मोशी येथून देहू फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होता. त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने दुचाकी (Moshi) घसरली आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मिक्सरला धडकली. या अपघातात पवन गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.