Moshi : लग्नाच्या अमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार 

abuse of a young woman for the sake of marriage

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिष दाखवून तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. ही घटना मोशी येथे घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 23) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बालाजी राम पाथरकर (वय 19, रा. आल्हाटवस्ती, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच, जीवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देत तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.