Moshi : रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

पुढील आठ दिवसात मागण्या पूर्ण करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली. त्यांच्या मागण्या पुढील आठ दिवसात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आमदार लांडगे यांनी नागरिकांना दिले.

रिव्हर रेसिडन्सी समोर 11 जानेवारी रोजी एक अपघात झाला. या अपघातात शिक्षिका वेदा मुळे यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी निलम हुले, श्रीरंग चोधरी, गणेश वाळूंज, चिखली मोशी चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे, प्रकाश जुकंटवार आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

संजीवन सांगळे यांनी याबाबत माहिती दिली. शिक्षिका वेदा मुळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित सर्वांनी हेल्मेट वापरणे, कमी वेगात वाहन चालवणे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. यानंतर संजीवन सांगळे यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला.

रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. नागरिकांची ही मागणी पुढील आठ दिवसात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आमदार लांडगे यांनी दिल्याचे सांगळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.