Moshi : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे दीडच्या सुमारास मोशी येथे घडली.

धनश्री गणेश गवारे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री धनश्री यांनी त्यांच्या मोशी येथील राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना उघडकीस आली असता घरच्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.