Moshi : डिज्नी ग्रुप ऑफ स्कूल्सचा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : एस आर एस एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ‘डिज्नी ग्रुप ऑफ स्कूल्स’, मोशी (Moshi) या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे होता.

‘अतुलनीय भारत’ या संकल्पनेवर विविध राज्याचे लोकनृत्य कलेचे कार्यक्रम बाल विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.
स्नेहसंमेलनाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. जी मुलांच्या पालकांनी सादर केली. त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

डिज्नी स्कूल वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शिक्षक वृंद यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खूप सुंदर असे परफॉर्मन्स झाले. सीमा तन्वर (President BJP education cell, president ECA), सेजल रे (NLP Expert), रोमन सुराणा (child Psycologist) आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आर्ट ऑफ पेरेंटिंग व मुलांच्या सर्वांगीण विकासावर पालकांना मार्गदर्शन केले.

Thergaon News : अभ्यास तर कराच, पण आनंदी आणि निरोगी जीवनासाठी खेळांनाही महत्त्व द्या. – कांतिलाल गुजर

याप्रसंगी एमआयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक मयूर भावसार (Moshi) यांचीही उपस्थिती होती. डिज्नी स्कूलचे अध्यक्ष विशाल भावसार सरांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कविता राठोड व चंदना नायर (school coordinator) यांनी शाळेचा आढावा स्क्रीनच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांना व पालकांना सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पल्लवी निफाडकर, श्रद्धा पाटील, अमृता बागजी आणि मेहजबिन यांनी केले. स्नेहसंमेलनानिमित्त शाळेत वर्षभर केलेल्या सहकार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने आदर्श पालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. डिज्नी स्कूलच्या संचालिका संगीता भावसार यांनी सांगता समारोहपर भाषण केले व उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.