Moshi : ‘राजदूत’मध्ये हॉटेल व्यवस्थापक आणि वेटरकडून ग्राहकाला मारहाण

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या ग्राहकांना हॉटेल व्यवस्थापक आणि वेटर यांनी मिळून मारहाण केली. वेटरने ग्राहकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामध्ये ग्राहक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास तुपेवस्ती मधील राजदूत हॉटेलमध्ये घडली.

जयेश विजय सावंत (वय 31, रा. मोशी) असे जखमी ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हॉटेलचा व्यवस्थापक आणि वेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास जयेश त्यांचा मित्र अंकुश खाचके याच्या सोबत तुपेवस्ती मधील राजदूत हॉटेल येथे दारू पिण्यासाठी गेले. त्यावेळी जयेश आणि आरोपींची दारूच्या कारणावरून भांडण झाले. त्या भांडणातून हॉटेलचा व्यवस्थापक आणि वेटर यांनी जयेश आणि त्यांचा मित्र अंकुश यांना मारहाण केली.

तसेच वेटरने जयेश यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. यामध्ये जयेश गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.