Moshi : गळा आवळून एकाचा खून; मृतदेह कन्स्ट्रक्शन साईटवर फेकला

एमपीसी न्यूज – गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका कन्स्ट्रक्शन साईटसमोर रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर मोशी येथे घडली.

ईश्वर सोमनाथ बदनाळे (वय 42, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. ईश्वर यांचे घरमालक सुजित दत्तात्रय सस्ते (वय 41) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित सस्ते यांच्या शिवाजीवाडी येथील चाळीमध्ये ईश्वर भाड्याने राहत होते. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ईश्वर यांचा मृतदेह मोशी-आळंदी रोडवरील हवालदारवस्ती येथे श्रीनाथ कन्स्ट्रक्शन साईटसमोर आढळून आला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यामध्ये त्यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. खुनाचे कारण अदयाप समजू शकले नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.