Moshi : पुढील सुट्टीच्या तीन शनिवारी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालय राहणार सुरु

ऑनलाईन बुकिंग घेतलेल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड आरटीओची सुविधा

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवार (दि. 29 फेब्रुवारी) पासून होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) 21 मार्च पर्यंत पहिल्या आणि तिस-या शनिवारी कामकाज सुरूच राहणार आहे. 29 फेब्रुवारी, 7 मार्च आणि 21 मार्च रोजी कामकाज सुरु राहणार आहे. नागरिकांनी पुढील 21 तारखेपर्यंत ऑनलाईन बुकिंग केले असून त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने पाच दिवसांच्या आठवड्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना केवळ पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवार (दि. 29 फेब्रुवारी) पासून होणार आहे. तरीही 21 मार्च पर्यंत पहिल्या आणि तिस-या शनिवारी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरु राहणार आहे. पूर्वी दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असत. त्यामुळे या दोन शनिवारी ऑनलाईन बुकिंग करता येत नव्हते. त्याचा फायदा अधिकारी-कर्मचा-यांना होणार आहे.

शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स), पक्की अनुज्ञप्ती (पर्मनंट लायसन्स), योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (फिटनेस पासिंग) यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यात येते. त्यानुसार, नागरिकांना निश्चित तारीख मिळते. त्या तारखेला संबंधित वाहन धारक वाहनांसह आरटीओ कार्यालयात येतात. 21 मार्च पर्यंत नागरिकांनी ऑनलाईन अपाईंटमेन्ट घेतल्या आहेत. राज्य शासनाच्या नियमानुसार येत्या शनिवार पासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असणार आहे.

येत्या शनिवार पासून आरटीओच्या अधिकारी-कर्मचा-यांनी सुट्टी घेतल्यास ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या नागरिकांची गैरसोय होईल. म्हणून 29 फेब्रुवारी, 7 आणि 21 मार्च रोजी आरटीओ कार्यालयाचे काम सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.