Moshi : पादचारी तरुणीचा विनयभंग प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज – रस्त्याने चाललेल्या तरुणीला अडवत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास अटक केली. ही घटना मोशी येथे सोमवारी सकाळी घडली.

अनिल तुळशीराम कुटे (वय 21, रा. मु. पो. नागेवाडी, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास मोशी येथून चालल्या होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने त्यांची वाट अडवत “तू मला खूप आवडतेस. माझ्याशी बोलली नाहीस तर संसाराची राखरांगोळी करील, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला.पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.