Moshi : चोरटयांनी दारूचे दुकान फोडले; बाटल्यासह हजारोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दारूचे दुकान फोडून दुकानातून दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण सहा हजार तीनशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना तपकिरनगर मोशी येथे सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली.

सोमनाथ महारुद्रया स्वामी (वय 32, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ स्वामी यांचे तपकिरनगर मोशी येथे जे एल राजपूत देशी दारूचे दुकान आहे. सोमवारी पहाटे त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून तीनशे रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि सहा हजार रुपयांची रोकड असा एकूण सहा हजार तीनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.