Moshi : टोलनाक्यावर सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याचीच!

पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

एमपीसी न्यूज – पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दररोज सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान मोशी टोलनाक्याच्या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. मोशी टोल नाक्यावर धीम्या गतीने चालणाऱ्या वाहतुकीमुळे सुमारे एक किलोमीटरपर्यंत म्हणजे चिंबळी फाट्यापर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत आहे. टोल नाक्यावरील वसुलीत होणा-या वेळेच्या अपव्ययाने रुग्णवाहिका, एसटी बस, पीएमपीएमएलच्या बसेस, कामगार, विद्यार्थी येथील कोंडीत अडकतात. या समस्येकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशी, वाहनचालक आणि नागरिकांनी केली आहे.

टोलनाका ते चिंबळी फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी होण्याचे एकमेव कारण म्हणजे टोलनाक्यावरील वसुली-वादावादी यात एका-एका वाहनाला पुढे जाण्यासाठी लागणारा दीर्घकाळ यामुळे या कोंडीमध्ये सायंकाळी भर पडून एक ते दीड किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागतात. सायंकाळी चाकण एमआयडीसीमधून वाहने सुटल्यानंतर सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत येथे हमखास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दररोज यावेळेत वाहतुकीची कोंडी होते. परिणामी, नागरिकांच्या वेळेचा आणि इंधनाचाही अपव्यय होत असल्याच्या तक्रारी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.