Moshi: मोशीतील 9 एकर जागेचे बाजार समितीला हस्तांतरण

एमपीसी न्यूज – मोशीतील 3 हेक्टर 83 आर जागा आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेच्या मोबदल्यात 3 हेक्टर 67 आर म्हणजेच 9 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने साडेतीन कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारकडे जमा केले आहे. मुद्रांक शुल्क बाजार समितीने की प्राधिकरणाने भरायचे, याबाबत एकमत होत नसल्याने हस्तांतरण रखडले होते.

बाजार समितीला जवळपास 9 एकर जागा मिळाली असून या जागेची किंमत बाजारभावानुसार अंदाजे 140 कोटी रुपयांची आहे. बाजार समितीचा मोशी उपबाजार 8 हेक्टर 99 आर एवढ्या जागेत आहे. या जागेवर 159 गाळे व 42 दुकानांचे बांधकाम केले आहे.

  • दरम्यान, बाजार आवारात काम सुरु झाल्यानंतर या जागेतून जाणा-या 31 मीटर रस्त्याची लांबी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास बाजार समितीने हरकत घेतली. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जागेची पाहणी केली. बाजार समितीच्या आवारात येणा-या-जाणा-या वाहनांना सुलभरित्या प्रवेश करता यावा, यासाठी प्राधिकरणाची बाजार समितीच्या पश्चिम बाजूस असणारी जमीन समितीला हस्तांतरित करण्याचे सुचविले होते.

प्राधिकरणाच्या 26 ऑक्टोबर 2007 रोजी झालेल्या सभेत मोशी येथील गट क्रमांक 845 मधील प्रस्तावीत केल्याप्रमाणे हस्तांतरित करावयाची 16 हजार 560 चौरस मीटर क्षेत्र हे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना आणि मोशी गट क्रमांक 852 मधील क्षेत्र अंदाजे 3 हेक्टर 83 आर इतकी जागा आंतरराष्ट्रीय औद्योगिक कृषी प्रदर्शन केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेच्या मोबदल्यात अदलाबदल दस्तान्वये देण्याबाबत निर्णय झाला. दरम्यान, या जागेवर शीतगृह, पेट्रोल पंप, तसेच भुसार विभागासाठी व्यापा-यांच्या मागणीनुसार 3 हजार स्केअर फुटाचे भुखंड उपलब्ध करुन देण्याचा समितीचा मानस आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.