Moshi : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती

एमपीसी न्यूज-संतनगर मित्र मंडळ , इंद्रायणी सेवा संघ व भूगोल (Moshi) फाउंडेशन तर्फे संतनगर येथील हनुमान मंदिर परिसरात पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.यावेळी  श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभागाचे मा. नगरसेवक आणि स्थायी समिती मा.अध्यक्ष विलासभाऊ मडीगेरी, मा.नगरसेविका  नम्रताताई लोंढे, सामाजिक कार्यकर्ते  योगेश लोंढे, संत साई इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक शिवलिंगजी ढवलेश्वर, शिवप्रेमी  रमेश तोत्रे, व इतर मान्यवर आणि संतनगर व परिसरातील नागरिक, महिला व मुले बहुसंख्येने हजर होते.

यावेळी महिलांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून मान्यवर, महिला व नागरिकांच्या हस्ते वड, पिंपळ, बेल, फणस, पारिजातक,अर्जुन, जास्वंद, चाफा, आपटा, कन्हेरी, तगर, कदंब, बकुळ, टिकोमा अशा विविध प्रकारचे देशी आयुर्वेदिक वृक्ष, व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल नाना वाळुंज यांनी मंडळ गेल्या 15 वर्षापासून करत असलेले वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, गड किल्ले स्वच्छता व संवर्धन, नदी स्वच्छता मोहीम, प्लॅस्टिक मुक्ती, पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती ,समाजप्रबोधन, पर्यावरण पूरक गणपती उत्सव, शिवजयंती, नवरात्र उत्सव , दीपोत्सव  कार्यक्रमांयाविषयी माहिती देऊन याची सुरुवात स्वतः पासून करण्याचे आवाहन केले.

Talegaon Dabhade : शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलेली शाबासकीची थाप जीवनात अमुलाग्र बदल घडविते – डॉ. सायली गणकर

विलास माडीगेरी , प्रा. शिवलिंग ढवलेश्वर व शिवभक्त श्री रमेश तोत्रे यांनी आपली वसुंधरा व पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षांचे काय महत्व आहे हे विविध दाखले देऊन पटवून दिले आणि सर्वांना अशा उपक्रमात सहभागी होणे ही काळाची गरज आहे, म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.

यावेळी  कर्नल तानाजी अरबुज, अनिल जगताप, अरुणशेठ इंगळे, मारुती गायकवाड, नवनाथ कोलते, विठ्ठल वीर, संभाजी पडवळ, सतिश देशपांडे, राजेश डहाके,जयसिंहग कोहिनकर, मच्छिंद्र बुर्डे, साहेबराव गावडे, तुळशीदास शिंदे, भाउराव अहिरे, नेताजी पाटील, संतोष पाटील,गणेश हजारे, महादेव गोमे, संतोष पवार, माणिकराव मानकर , अजिंक्य पोटे, पोपट हिंगे, यादवराव जाधव, आनंद निघोट, शिवराम काळे, राजेंद्र ठाकूर, अनिल घाडगे,संजय रसाळ, केदार काका, धर्मा पाटील,

अंकुश जाधव, एकनाथ फटांगडे, सुरेश फरताळे, जगदाळे साहेब,कु.अभिनव सागडे,अंबादास कुमावत,ह्रषीकेश डहाके,रमेश पाटील,बिराजदार सर,शिवाजी लंके ,अशोक वाडेकर, चेअरमन अशोक यादव, अनिल पोवार,जक्कनवार, दत्तात्रय शिंदे,कु आदित्य पाटील तसेच महिलांमध्ये मंदा मानकर , शोभा फटांगडे, मंगल अहिरे,रोहिणी फरताळे, रोहिणी वाळुंज , बिराजदार ताई,भारती डहाके,बुर्डेताई, मेघा पाटील,सेजल वाळुंज, अपूर्वा वाळुंज, एरंडेताई,श्वेता पाटील हे पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन (Moshi) झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.