Moshi : रिक्षाचालकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाला लोखंडी टॉमीने मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आदर्शनगर, मोशी येथे घडली.

विठ्ठल गोविंद बोदले आणि आकाश बधे (दोघेही रा. आदर्शनगर, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी मारूती गंगाधर देवईबोने (वय 33, रा. श्रीराम कॉलनी, धर्मवीर चौक, मोशी) यांनी रविवारी (दि. 16) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आदर्शनगर, गणपती मंदीराजवळ आरोपी भेटले. फिर्यादी यांनी त्यांना जेवण झाले का?, अशी विचारणा केली. मात्र, आरोपींचा काही गैरसमज झाल्याने त्यांनी फिर्यादी देवाईबोने यांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या नाकातून रक्‍त येऊ लागले. त्यानंतर आरोपी आकाश याने लोखंडी टॉमीने मारहाण करून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like