Moshi : मोशी येथे विनयभंगच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – मोशी येथे गंधर्वनगरीमधील इंद्रलोक कॉलनीत महिलांशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केल्याच्या शनिवारी (दि. 18) दोन घटना घडल्या. याबाबत रविवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पहिली घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास इंद्रलोक कॉलनी क्रमांक तीन येथे घडली. पोलिसांनी सुफियान सुलेमान सुनोसरा याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक पुजारी तपास करीत आहेत.

दुसरी घटना इंद्रलोक कॉलनी क्रमांक एक येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली असून एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घराकडे जात असताना आरोपीने त्यांचा हात पकडून त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.