BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : दोन दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; एकावर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – एका दुचाकी दुसऱ्या दुचाकीस धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे घडली.

लक्ष्मी महादेव जगताप (वय 50, रा. मांजरीरोड, मुंमोशी ढवा, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

ओंकार शिवाजी ठोंबरे (रा. शिवाजीवाडी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. महादेव केशवराव जगताप (वय 58) यांनी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2019 रोजी फिर्यादी महादेव जगताप हे आपल्या दुचाकीवरून पत्नीसह चालले होते. ते मोशीतील बोराटे वस्ती रोड, येथे आले असता आरोपीच्या दुचाकीने जगताप यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3