Moshi : घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरली

एमपीसी न्यूज – घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी मोशी येथील गंधर्व नगरी येथे उघडकीस आली.

सुभाष मांगीलाल डागा (वय 58, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा एक कामगार गंधर्व नगरी मोशी येथे राहतो. त्याने त्याची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी झेड 1902 ही दुचाकी घराच्या पार्किंगमध्ये सोमवारी (दि. 4) रात्री पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.