Moshi : भाजी विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – भाजी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे दीडच्या सुमारास मोशी मधील खान्देश नगर येथे घडली.

बालाजी दामू खैरनार (वय 58, रा. खान्देश नगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालाजी हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आज पहाटे दीडच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.