Moshi: रिक्षाच्या धडकेत पादचारी ठार

एमपीसी न्यूज – रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला. ही घटना मोशी येथे घडली.

मारुती मुडपे असे अपघातात ठार झालेल्या पादचा-याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश ज्ञानोबा रोकडे (वय 32, रा. किवळे निवास, शिवाजीवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच-14-एझेड-1676 या रिक्षावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • मारुती मुडपे हे 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मुडपे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.