Moshi : मोशीतील होर्डींगधारकावर गुन्हा दाखल करणार; पालिकेची माहिती

एमपीसी न्यूज – स्पाईन रोड, मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील अधिकृत परवानगी  असणारे 20 बाय 40 फुट आकाराचे होर्डींग आज दि.(14 मे) रोजी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर पडले असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी(Moshi) झाली नाही. सदर होर्डींगचे परवानाधारक आनंद ॲडव्हर्टायझिंगचे आनंद गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मुंबईत दि.(14 मे) रोजी घाटकोपर येथे बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग पडल्यामुळे 17 लोक मृत्युमुखी पडले असून 75 जण जखमी झाले आहेत. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व होर्डिंग्जबाबत संबंधितांची बैठक शुक्रवार (दि 17) मे रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत होणार आहे. तसेच शहरातील सर्व होर्डींग चे स्ट्रक्चरल ॲाडीट युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.

Moshi : मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, सुदैवाने जिवीतहानी नाही

आज दि.(16 मे) रोजी मोशी येथे झालेल्या घटनेत सदर होर्डींग हे तिथे असलेल्या टेम्पोवर पडल्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे. सदर घटनेची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर व उपायुक्त संदीप खोत यांना घटनास्थळी(Moshi) पाहणीच्या सूचना दिल्या.पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डींगचे सर्वेक्षण सुरू असून सोमवार पासून त्यावर कारवाईची मोहिम सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.