Moshi: पुणे महापालिकेला कचरा डेपोला जागा देण्याबाबत पिंपरी महापालिका प्रशासन गप्प का ?

मोशीतील ज्ञानेश्वर बो-हाडे यांचा सवाल

एमपीसी न्यूज – मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महापालिकेला स्वतंत्र कचरा डेपोस देण्यास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. त्याच्या निषेधार्थ गावबंद आंदोलन केले; मात्र आंदोलनानंतर देखील पिंपरी महापालिका प्रशासन गप्प का आहे ? आपली भूमिका का जाहीर करत नाही ? असा सवाल मोशीतील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बो-हाडे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत बो-हाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गावक-यांनी गावबंद आंदोलनानंतर पिंपरी -चिंचवड महापालिका प्रशासनाने कोणतीच भुमिका घेतली नाही. सध्या पिंपरी महापालिकेच्या कच-याचा भार मोशी गावातील नागरिक सोसत आहे. आधीच मोशीतील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न धोक्यात आहे. याआधीही मोशीतील नागरिकांनी भरपूर आंदोलने केली आहेत. आता पुन्हा पुण्यातील कचरा मोशीत आणण्याचा घाट घातला जात आहे. पुणे महापालिका मोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत नसेल तर सरकारने मोशीगाव पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून वगळावे.

मोशीकरांनी केलेल्या आंदोलन 100 यशस्वी झाले आहे. यातून गावक-यांची एकी दिसून आली. मोशी, डुडळगाव, च-होली, भोसरी आणि चिखली या सर्व गावांचा विरोध आहे. हा आमचा लढा यापुढेही असाच चालू राहणार आहे. प्रसंगी उपोषण करु, आमचं रक्त सांडू पण हा लढा चालू ठेवू. आमचा सर्वांचा विरोध आहे आणि विरोधच राहणार आहे ही आमची भुमिका आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2