Moshi : घरगुती कारणावरून महिलेला मारहाण; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात महिलेला तिचा भाऊ, वहिनी आणि आईने मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली. या घटनेबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

सारिका कुंडलिक बागडे (वय 36) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. 4) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाऊ मनोज बबन बागडे, मीना मनोज बागडे आणि मथुरा बबन बागडे (सर्व रा. नागेश्‍वर नगर, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी सारिका यांचे त्यांच्या आईशी घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. त्यावेळी तिथे आलेला भाऊ मनोज याने लाकडी दांडक्‍याने सारिका यांना मारून जखमी केले. तसेच त्याची पत्नी मीना आणि आई मथुरा यांनी सारिका यांना हाताने व लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण केली.

तर, कुंडलिक बबन बागडे यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सारिका कुंडलिक बागडे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कुंडलिक यांनी आरोपी सारिका यांना दुकान भाड्याने दिले आहे. वारंवार सांगूनही ती दुकान खाली करीत नव्हती. या कारणावरून सारिका हिने भांडण करीत वडिल कुंडलिक यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. पोलीस हवालदार भांडवलकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.