Moshi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणास अटक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास अटक केली आहे. ही घटना मोशी येथे घडली.

अजिंक्‍य राजाराम कुदळे (वय 26, रा. शितळादेवी चौक, पिंपरीगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 28 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2018 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत आरोपी कुदळे याने पिडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मोशी येथील लॉजवर, पानशेतमधील फार्म हाऊस तसेच मोटारीमध्ये वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तसेच अनैसर्गिक कृत्य देखील केले. याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.