Moshi : क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 27 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका महिलेची 27 लाख 500 रुपयांची (Moshi) फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 मार्च ते 29 मार्च या कालावधीत बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार +62 85760134280 या क्रमांकावरून व्हाटसअप, टेलिग्रामवरून अर्पिता नावाने बोलणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ST News : एसटीच्या पहिल्या फेरीचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी महिलेने फिर्यादीस व्हाटसअप आणि टेलिग्राम या सोशल मिडीयावर मेसेज करून क्रिप्टो करंसीमध्ये शोर्ट प्रीपेड प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळवून देण्याचे (Moshi) आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांचा ट्रेड चुकल्याचे सांगून दंड, इनकम टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून 27 लाख 500 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.