Moshi : दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर झाडू मारत असलेली कामगार महिला जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर झाडू मारत असलेल्या कामगार महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेनऊच्या सुमारास आदर्शनगर मोशी येथे घडली.

रमा प्रेमचंद नरवडे (वय 40, रा. आदर्शनगर, मोशी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एमएच 14 / एल 8694 या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सकाळी त्यांच्या घराच्या बाजूला रस्त्यावर झाडू मारत होत्या. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरून भरधाव वेगात आला. दुचाकीस्वाराने रमा यांना धडक दिली.

या धडकेत रमा यांच्या खांद्याला, हाताला, नाक व तोंडाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.