Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने वार; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या गळ्यावर दोघांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी सात वाजताच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.

तेजस भोपालसिंग भूल (वय 18, रा. फोर्स मोटार कॉलनी, थरमॅक्‍स चौक, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रितेश राम (पूर्ण नाव माहिती नाही) तसेच त्याचा अनोळखी साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी तेजस हे बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील मातेरे हाऊसजवळील मोकळ्या मैदानात खेळून झाल्यावर आपल्या गाडीकडे चालले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तेजस याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.