Pune News : पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण, पुण्यात 18,237 रुग्ण 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 

राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. पुण्यात 18 हजार 237 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाण्यात 16 हजार 598, मुंबईत 11 हजार 558 तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात 13 हजार 806 तर सांगली जिल्ह्यात 11 हजार 465 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पाच जिल्ह्यांत दहा हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असून, पश्चिम महाराष्ट्रातील अधिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 49 हजार 264 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 06 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.08 एवढा झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 25 हजार 528 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.03 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.