Most Expensive Sperm Whale Vomit : व्हेल माशांची उलटी सोने-हिऱ्यांपेक्षाही जास्त किमती!

एमपीसी न्यूज – व्हेल माशांच्या उलटीची म्हणजेच अंबरग्रीसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचते. म्हणजेच सोने किंवा हिऱ्यांपेक्षाही हा पदार्थ किमती आहे.

चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे वनविभागाच्या वतीने कारवाई करत एका महिलेसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आरोपींकडून व्हेल माशाची उलटी सदृष्य 3 किलोग्रॅम पदार्थ आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या कोट्यवधींच्या घरात किंमत असणाऱ्या या पदार्थाविषयी शहर व परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

हा पदार्थ एवढा किमती होण्यामागील कारणेही तशीच आहेत. हा पदार्थ समुद्रातून बाहेर काढण्यासाठी कित्येक महिने लागतात. खूप शोध घेतल्यानंतर ते मिळू शकतात. त्याचा वापर विशेष परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त प्लेगच्या प्रतिबंधासाठी देखील याचा उपयोग केला जातो. यासह हे अनेक प्रकारच्या रोगांवरील औषधांमध्येही याचा वापर केला जातो.

अंबरग्रीस हा मेणयुक्त पदार्थ आहे जो स्पर्म व्हेल या समुद्री महाकाय माशांपासून तयार होतो. हा एक महागडा पदार्थ उंची अत्तरे आणि कामोत्तेजक उत्पादनांमध्ये वापरला जातो. अंबरग्रीस एक तपकिरी पदार्थ आहे जो व्हेलच्या उदरात बनतो आणि ते उलटीद्वारे तो बाहेर सोडतात. अत्तर बनवणाऱ्यांकडून फिक्सेटिव्ह म्हणून त्याचे खूप मूल्य आहे. त्यामुळे  सुगंध जास्त काळ टिकतो.

सौदी अरेबिया, कुवेत, ओमान सारख्या आखाती देशांमध्ये या पदार्थाला जास्त मागणी आहे. व्हेलच्या उलट्या (अंबरग्रिस) स्पर्म व्हेल या दुर्मिळ प्रजातींच्या माशांच्या आतड्यांमधून बाहेर पडतात. जेव्हा व्हेल उलटी करतात आणि ती कोरडी होते तेव्हाच ती बाहेर पडते.
शास्त्रज्ञांच्या मते, व्हेल माशांच्या उलटीपासून तयार झालेला हा विशेष दगड एक प्रकारचा कचरा आहे. व्हेल तो पचवू शकत नाहीत आणि कधीकधी त्यांच्या तोंडातून तो बाहेर पडतो. त्यांना वैज्ञानिक भाषेत अंबरग्रिस असेही म्हणतात. त्याचा रंग काळा किंवा तपकिरी आहे. हा मेणासारखा दहनशील पदार्थ आहे. साधारणपणे याचे वजन 15 ग्रॅम ते 50 किलोग्राम पर्यंत असू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.