Dighi : स्पीडब्रेकर वरून गाडी उडून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

Mother dies after a bike driven by his son jumps over a speedbreaker.

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आईला घेऊन जात असताना हलगर्जीपणे दुचाकी चालवणा-या मुलाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मुलाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 23 जून रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विश्रांतवाडी ते दिघी या रोडवर घडला. याबाबत 28 जुलै रोजी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधीर रमेश चोखले (वय 45, रा. शांतीनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. सरिता रमेश चोखले (वय 65) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए एस घोगरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी रात्री साडेआठ वाजता आरोपी सुधीर आणि त्यांची मयत आई विश्रांतवाडी-दिघी रोडने एम एच 12 / एस सी 4471 या दुचाकीवरून जात होते.

सुधीर दुचाकी चालवत होता. त्यांची दुचाकी दिघी येथील काळूबाई मंदिराच्या समोर आली असता तिथे रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरवर गाडीचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे दुचाकी जोरात आदळली.

यात सरिता उडून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे मुलाने हलगर्जीपणा केल्याने हा अपघात झाल्याने सरिता यांचा मृत्यू झाल्याने सुधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.