Wakad : सुनेकडून सासूला मारहाण

एमपीसी न्यूज – ‘तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मला कशाला घेता’ असे सासूने म्हटले असता सुनेने सासूला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाकड (Wakad) येथे घडली.

Vilas lande: निमित्त वाढदिवसाचे लक्ष्य लोकसभेचे!

याप्रकरणी जखमी सासूने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासूने सुनेला ‘तुमच्या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये मला कशाला घेता’ अशी विचारणा केली. त्यावरून सुनेने सासूला वाईट बोलत त्यांच्या अंगावर धावून येत झटापट केली. सासूने सुनेला लांब ढकलण्याचा प्रयत्न केला असता सुनेने सासूला मारहाण केली. यामध्ये सासूच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.