Bhosari : सासू-सुनेला लाथाबुक्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज – सासू आणि सुनेला घरातून निघून जाण्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. ही घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे घडली.

कोकीळा वैंजारभाट, अर्जून वैंजारभाट, भिमा राठोड, मानसी राठोड आणि राखी राठोड (सर्व रा. मोशी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी फिर्यादी महिला आणि तिची सासू घरात असताना आरोपी त्यांच्या घरी आले. त्यांना राहत्या घरातून निघून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी दोघींना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता महिलेच्या सासूचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिली. फौजदार तलावडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.