Motion Poster Launch: ‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाचे मोशन पोस्टर लाँच

Motion Poster Launch: Motion poster launch of 'Law of Love' movie गोड प्रेमी जोडप्यांची अनेक बाबतीत समाजकंटकांकडून अशी परवड होत असली तरीही फुलपाखरांची एक जोडी नेटाने कोर्टाचं दार ठोठावते.

एमपीसी न्यूज – ‘लॉ ऑफ लव्ह’ या आगामी मराठी सिनेमाचे मोशन पोस्टर लाँच झाले असून सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्याचे अनावरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ऑनलाइन माध्यमातून फस्ट लूक देखील लॅान्च करण्यात आला होता.

‘लॉ ऑफ लव्ह’ चे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांच्या या पहिल्या प्रयत्नाबाबत चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नुकताच लाँच झालेल्या या मोशन पोस्टरमध्ये गुलाबी रंगाच्या बदामी आकारात एकत्रित जमा झालेली भरपूरशी फुलपाखरं अनेक प्रेमी युगुलांप्रमाणे त्यांचं निरागस प्रेम फुलवताना दिसतात. त्यांच्यावर अचानक भिरकावलेला खडा क्षणार्धात सगळं काही विखरून टाकतो आणि पाखरं जिकडे तिकडे सैरभैर उडू लागतात.

गोड प्रेमी जोडप्यांची अनेक बाबतीत समाजकंटकांकडून अशी परवड होत असली तरीही फुलपाखरांची एक जोडी नेटाने कोर्टाचं दार ठोठावते. आपलं खरं प्रेम जिंकण्यासाठी आणि शेवटपर्यंत तडीस नेण्यासाठी या जोडीचा प्रयत्न या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये ठळक दिसतो.

त्यांची ही व्यथा समाज आणि कायद्याच्या चौकटीत बसते का? प्रेमाला स्वतःचं अस्तित्व मिळविण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आजही लढा द्यावा लागत आहे का? यासारख्या अनेक गोष्टींची उकल सिनेमात पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण अनलॉक झाल्यानंतर प्रेक्षकांच्या बदललेल्या चवीसाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे. या सिनेमात नक्की कोण-कोणते कलाकार असणार आहेत, कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.

याबाबत निर्माता आणि पटकथाकार जे. उदय म्हणतात, ‘प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. असा हा लॉ ऑफ लव्ह सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.