Pune : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जकात नाक्याजवळ घडली.

नरसिमला मालकोडय्या मदाला (वय 39, रा. बालाजीनगर, पुणे), असे मयत मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. तर आरोपी देविदास पिराजी (रा. नाशिक) याला अटक केली आहे. तर अर्जुन धर्नीकल (वय 34, रा. घोरपडी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

नरसिमला हा मुंढव्यातील जकात नाक्याजवळील स्पोर्टस् अकॅडमी कॅम्प येथून जात असताना आरोपी पिराजी यांनी त्यांच्या ताब्यातील टेम्पो हा भरधाव वेगात चालवून नरसिमलाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. धर्नीकल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिराजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंढवा पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.